नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेचं केवळ नाटक सुरू आहे ः फडणवीस 

0

मुंबई : “निवडणूका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे ठरवून करत आहे. शिवसेनेनं आता औरंगाबादचे संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खूष होतील. काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. यावरुन हे स्पष्टपणे लक्षात येतंय की, निवडणुका आल्यामुळं ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरु झाली आहे. मला असं वाटतं की हे केवळ नाटक सुरु आहे”, अशा टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेने आणि काॅंग्रेसवर केली.

“मी मुख्यमंत्री असताना औरंगाबाद रस्त्यासाठी पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. १०० कोटी देतो असं सांगितलं होतं. पण ते आधीचे पैसे खर्च करु शकले नाहीत. १६०० कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिले होते. इतक्या दिवसानंतर आता त्याची कामाची ऑर्डर निघाली आहे. हे काम आतापर्यतं कितीतरी पुढं जायला हवं होतं. त्यामुळे औरंगाबादमध्ये इतके वर्ष सत्ता चालवून देखील, कुठलही महत्वाचं कार्य करता न आल्याने आता अशाप्रकारची भाषा सुरू आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व सुरू आहे”, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

“औरंगाबाद संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही. भाजपाने औरंगाबाद पालिकेत ४ वेळा हा प्रस्ताव दिला होता. बोर्डावरही हा प्रस्ताव आणला गेला नाही. शिवससेनेच्या मनातच होचं तर, नामांतराचा प्रस्ताव पुढे का आला नाही”, असा प्रश्न फडणवील यांनी उपस्थित केला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.