शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकाचे

0

मुंबई : कर्नाटक बाधित सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आघाडी सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. यातच शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते, असा अजब दावा कर्नाटकच्या उपमुख्यमंतत्र्यांनी केला आहे.

कर्नाटकातील मराठी भाषिक भाग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित प्रदेश जाहीर करावेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच केली होती. त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोल म्हणाले, “ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही.

शिवाजी महाराजांचे पूर्वज बेलीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे होते. गदग जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज हे त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी होते,” असा दावा त्यांनी केला आहे.

तर दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी म्हटलं की, “ठाकरे यांनी मराठी भाषिक भागांचा प्रश्न त्यांच्या सरकारमधील मतभेदांवरून लक्ष उडवण्यासाठी उकरून काढला आहे. त्यांना करोनाची साथ हाताळता आली नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता संपुष्टात आली आहे.” सावदी यांनी ठाकरे यांच्या विधानावर मुंबई हा कर्नाटकचा भाग करावा व केंद्राने त्या निर्णयापर्यंत मुंबई हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.