धक्कादायक ! आयएएस अधिकाऱ्याने पैसे घेऊन केले उमेदवार पास; उपसचिवास अटक

0

पुणे : राज्यभर गाजत असणाऱ्या टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्या बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोट्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलीसांचे पथक त्याला घेऊन पुण्याला निघाले आहे. सुशील खोडवेकर ( ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलीसांकडून २०१९-२० चा टीईटी घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. याप्रकरणात आयुक्त तुकाराम सुपे तसेच शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि चैनमधील इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे तपास केले जात आहे. त्यादरम्यान, अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सावरीकर याच्याकडून पैसे घेतले.

तसेच, अनेक मुलांना पास केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगून ही मुले पास केली आहेत. सुशील यांनी सावकरीकरकडून पैसे घेतले आणि सुपेंना सांगून मुले पास केली आहेत, असे पुणे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. सुशील हे मंत्रालयात उपसचिव म्हणून काम करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.