पिंपरी : सुसगाव मध्ये धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. इंजिनिअरिंग झालेल्या तरुणाने नोकरीसाठी ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही या भीतीने आत्महत्या केली. सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी घडली आहे.
अक्षय अमोल माटेगावकर (21 वर्ष, शिक्षण, रा फ्लॅट नंबर 807, माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूम पाठीमागे, सुसगाव) याने आत्महत्या केली आहे. राहत्या घराच्या बालकणीतून (८ वा माळा) उडी मारून आत्महत्या केली आहे.
माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यामध्ये त्याने त्याला प्लेसमेंट होणार नाही या भीतीने सुसाईड केले असल्याचे नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.