पिंपरी : मुलाने केलेल्या भांडणात जाण्यास आईने विरोध केला. त्या कारणावरून मुलाने आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री पावणे नऊ वाजता राक्षेवाडी चाकण येथे घडली.
राहुल शिवाजी जाधव (वय 28, रा. राक्षेवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मुलगा आहे. त्याला फिर्यादी यांनी पैसे कमी दिले. तसेच आरोपी मुलाने केलेल्या भांडणात जाण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. या दोन्ही कारणांवरून आरोपी राहुल याने फिर्यादी आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी आई जखमी झाली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.