धक्कादायक…पतीनेच पत्नीला ‘ते कृत्य’ करण्यास सांगितले

0

पुणे : सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरीक संबंध ठेवायला सांगितले. त्याला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या तिच्या आईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हडपसर येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४०५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिचे पती, दीर व सासुवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील शिंदे वस्ती येथील सोसायटीत ७ मे २०१७ ते १० नोव्हेबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर सासरकडील लोकांनी संगनमत करुन फिर्यादी यांना घरातील काम व्यवस्थित येत नाही म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या पतीने दिराबरोबर शारीरीक संबंध ठेव, असे सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. ही बाब तिने आपल्या आईला सांगितली.

जाब विचारण्यासाठी विवाहितेची आई वडिल गुरुवारी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. आईचा विनयभंग केला. तसेच वडिलांच्या करंगळीजवळ चाकून मारुन त्यांना जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.