कोल्हापूर : शेजारील घरात गप्पा मारायला गेलेल्या महिलेचे हात-पाय बांधून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरात कोणीही महिला नसल्याने तिचे हात-पाय खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.