धक्कादायक…. हत्याराने वार करुन सावत्र आईचा खून

0
पिंपरी : वडील सावत्र आईकडे जास्त राहत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने सावत्र आईचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.
रेखा (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ऋषीकेश सुभाष वाघमारे (वय 15, रा. श्रीहरी गृहनिर्माण सोसायटी, तळेगाव दाभाडे) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांच्या अल्पवयीन सावत्र भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी रात्री त्यांच्या आईकडे जेवण करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचे सावत्र वडील हे फिर्यादी यांच्या आईकडे जास्त राहतात या कारणावरून सावत्र वडील आणि सावत्र आई यांचा वाद सुरू होता. त्यावेळी फिर्यादी यांचा सावत्र भाऊ आरोपी याने त्याच्या वडिलांशी भांडण केले आणि घरातून निघून गेला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या फोनवर फोन करून त्याच्या पत्नीला खाली बोलावून घेतले. फिर्यादी यांची आई राहत असलेल्या घरी जाऊन धारदार हत्याराने तिच्या डोक्यात, पाठीवर, मानेवर, हातावर वार करून खून केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.