धक्कादायक….कोविशिल्ड लसीचा डोस घेतलेल्या १६.१ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळल्याच नाहीत

0

नवी दिल्ली : देशात डेल्टा व्हेरिएंटचं संकट कायम आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर लसीकरण सुरु आहे. मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १६.१ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या अँटिबॉडी आढळल्याच नाहीत. ज्या लोकांनी कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतला आहे. अशा ५८.१ टक्के लोकांच्या चाचण्यांमध्ये अँटिबॉडी दिसल्या नाहीत. त्यामुळे भारतातील काही लोकांना कोविशिल्ड लसीचा अतिरिक्त बूस्टर घ्यावा लागेल, असे संकेत अभ्यासातून मिळत आहेत.

“कोविशिल्डची लस घेतलल्यांमध्ये अँटिबॉडी तयार झाल्या असतील. मात्र त्याचं प्रमाण तुलनेनं कमी असेल. त्यामुळे त्या डिटेक्ट झाल्या नसतील. करोनापासून बचाव होईल इतक्या अँटिबॉडीज त्यांच्या शरीरात असतील. अँटिबॉडी आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार होणं या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत”, असं वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

दरम्यान, यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी सर्वच लोकांना संदेश दिला आहे. “लोकांना हे समजायला हवं की करोनाचं संकट अद्याप ओसरलेलं नाही. आजघडीला राज्यात रोज तब्बल ८० हजार चाचण्या केल्या जात आहेत. जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा राज्य सरकारने आरोग्य सुविधा आणि लस तुटवडा देखील सुधारण्यासाठी प्रयत्न केले. अधिकारी वर्गाने देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला हवी. तुलनेनं महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळत आहेत”, असं देखील शिवराजसिंह चौहान म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.