धक्कादायक …तेरा वर्षीय मुलगी गरोदर

0
शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालंय. आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या ओळखीचा आणि नेहमी घरी ये जा करणारा आहे. शिक्रापूर पोलिसांमध्ये याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी सणसवाडी येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. आई-वडील कंपनीत कामाला होते. हे दोघेही कंपनीत कामाला गेल्यानंतर गावातीलच आरोपी तरुण हा त्यांच्या घरी ये जा करत होता. जुलै 2020 मध्ये आरोपीने पीडित मुलीला घराच्या पाठीमागील भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने याविषयी घरच्यांना काहीही सांगितले नव्हते. त्यानंतर आरोपी वारंवार तिच्या घरी येत राहिला आणि तिच्यावर अत्याचार करत राहिला.
दरम्यान मागील काही दिवसांपासून पीडित मुलीच्या आईला मुलीच्या शरीरावरून शंका आल्याने तपासणी केली असता ती मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.