धक्कादायक : होस्टेल मधील 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल
काही विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न
मोहाली : मोहालीतील चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याघटनेनंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एकीची प्रकृती चिंताजनक आहे.
हा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने बनवला असून तिने तो शिमल्यातील मित्राला पाठवला होता. हे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्टकेले आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर शनिवार–रविवारच्या रात्री चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ झाला, जो आतापर्यंत सुरू आहे. विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आंदोलन करत आहेत.
ज्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि ज्या विद्यार्थिनीने व्हायरल केले, त्या सर्व MBA मध्ये शिकतात. आरोपी विद्यार्थिनीबऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवून तिच्या मित्राला पाठवत होती. हे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. सोशल मीडियावरएका विद्यार्थिनीने व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर गोंधळ सुरू झाला.
हॉस्टेल वॉर्डनने आरोपी तरुणीला विचारपूस केली असता तिने सांगितले की, मी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवले आहेत. मुलीनेसांगितले की, ती त्या मुलाला ओळखत नाही. वॉर्डनने अनेकदा विचारणा करूनही मुलीने या मुलाशी तिचे नाते काय आणि तो कोणआहे हे सांगितले नाही. तिला विचारण्यात आले की, ती कधीपासून हे व्हिडिओ बनवत आहे, विद्यार्थिनीने त्याचेही उत्तर दिले नाही. तीपुन्हा पुन्हा चूक झाली, आता यापुढे करणार नाही असे सांगत राहिली.
विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचा व्हॉईस मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची अद्याप पुष्टी झालेली नाही. यामेसेजमध्ये एक मुलगी म्हणत आहे– एका मुलीने व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे. सुरुवातीला 4 मुलींसोबत हा प्रकार घडल्याचे तेसांगत होते. आता असे कळते की, 60 पेक्षा जास्त मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. डी ब्लॉक, सी ब्लॉक, बी ब्लॉकमध्ये सर्वब्लॉकमधील मुलींचे व्हिडिओ बनवले जात आहेत. हे काम करणाऱ्या तरुणीने तिला कोंडून ठेवले आहे. जे अधिकारी आहेत, वॉर्डनआहेत, तेच हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचे बोलत आहेत. आम्हाला सकाळपासून एकामागे एक धक्के बसत आहेत. हे प्रकरण येथेचसंपवण्यास आम्हाला सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थिनी वसतिगृह रिकामी करून बाहेर आल्या. त्यांनी ‘आम्हाला न्याय हवा‘ अशा घोषणा देण्याससुरुवात केली. मुलींनी संपूर्ण विद्यापीठाला वेढा घातला. हे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे दरवाजे बंद केले. तत्काळ पोलीसदलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थिनींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्यापीसीआर पथकांची वाहने उलटवली. त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता.