पुणे: पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुरसुंगीभागातील भोसले व्हिलेज सोसायटीत ही घटना घडली आहे.
पती, पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या घटनेत पतीचाउपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून घरी परतलेली पत्नी आणि मुलाने पुन्हा विषारी ओैषध पिऊन आत्महत्याकेल्याची घटना सोमवारी (२६ जून) उघडकीस आले.
जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (४१) अशी आत्महत्या केलेल्या महिला आणि मुलाची नावे आहेत. २२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी), त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषधपिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
त्यांना तात्काळ तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पत्नी आणि मुलाला वाचवण्यात यश आलं होतं. उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना रुग्णालातून घरीसोडण्यात आले होते.
घरी येताच या दोघांनी सोमवारी विषारी औषध पिऊन पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनातातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चेतन याचा घटस्फोट झाला होता. तोनोकरीही करत नव्हता. कौटुंबिक समस्या, तसेच आजारपणामुळे या कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा संशय आहे.