एकतर्फी प्रेमातून गोळीबार; आरोपी अटकेत

0

पुणे  : पुण्यातील खडकवासलाजवळील कोल्हेवाडी गावाजवळ एकतर्फी प्रेमातून कारमधून जाणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. हवेली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

अक्षय उर्फ रावण चंद्रकांत दुबे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी  एका 45 वर्षीय व्यक्तीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी हे कोल्हेवाडी येथील मुक्ताई हॉटेल येथे आले होते. यावेळी त्यांना त्या ठिकाणी अक्षय दुबे दिसला. त्यांनी त्याच्या जवळ जात आमच्या  नातेवाईक महिलेला त्रास का देतोस, अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने त्याच्याकडे असलेली बंदूक काढून फिर्यादी यांच्यावर रोखली.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी कारमधून पोलीस ठाण्यात जात असताना आरोपीने किरकटवाडी येथे त्याची वाट अडवून त्यांच्या  दिशेने गोळी झाडली आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.