पुणे : डुक्कर खिंडीतील ‘त्या’ गोळीबाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कृत्य केल्याचं असल्याचे समोर आले आहे.
अभिजीत तुकाराम येलवंडे (24) याला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी नकुल शाम खाडे याच्यासह चेतन चंद्रकांत पवार व उमेश चिकणे यांचा शोध सुरु आहे.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शनिवारी सकाळी साडे नऊ ते 10 वाजण्याच्या सुमारास बिल्डर रविंद्र सखाराम तागुंदे (36) यांच्यावर चार अज्ञातांनी येऊन गोळीबार केला होता.
गोळीबाराची घटना समोर येताच शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या दरम्यान हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला. हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या होत्या. पण, सुदैवाने पळून जात रवींद्र यांनी आपला जीव वाचला होता.
खंडणी विरोधी पथकाचे पोलिस नाईक राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना गोळीबारातील आरोपी अभिजित हा गोसावी वस्तीत येणार आहे, अशी माहिती मिळाली. पथकाने त्याला सापळा रचून त्याला पकडले.
या दोघांनी साथीदारांसोबत गोळीबार केला. रवींद्र याने त्यांचा मित्र दीपक सोनवणे याचा खून केला होता. 2013 हा खून झाला होता. त्यानंतर या खून प्रकरणात रवींद्र जामिनावर आहे. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नकुल खाडे याने शपथ घेतली होती.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे, नितीन रावळ, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव यांच्या पथकाने केली आहे.