गरोदर महिलांनी कोरोना लस घ्यायची का?…वाचा तज्ञांचे मत

0
मुंबई : प्रेग्नंट महिलांसाठीही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. कोरोना लस प्रेग्नंट महिलांसाठी सुरक्षित आहे. फक्त प्रेग्नंट महिलाच नव्हे तर तिच्या बाळासाठीही कोरोना लस सुरक्षित आहे आणि लसीकरणामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो, असं संशोधनात दिसून आलं आहे. त्यामुळे प्रेग्नंट महिलांनीही कोरोना लस घ्यावी असा सल्ला दिला जातो आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये कोणती कोरोना लस घ्यावी असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.
मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी प्रेग्नन्सीत महिलांनी कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हवर त्यांनी प्रेग्नसी आणि कोरोना लसीकरण याबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रेग्नन्सीत कोणती कोरोना लस घेणं सुरक्षित आहे.
डॉ. गंधाली देवरुखकर यांनी सांगितलं, “तशा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही कोरोना लशी प्रेग्नन्सीत सुरक्षितच आहेत. पण तुम्ही हाय रिस्क गटात असाल तर कोवॅक्सिन घ्या आणि लो रिस्क गटात असाल तर कोविशिल्ड घ्या. हाय रिस्क गटात म्हणजे ज्या प्रेग्नंट महिलांना प्रेग्न्सीसोबत प्रेग्नन्सीसंबंधी इतर समस्या किंवा मधुमेह, बीपी आणि हृदयाचे इतर आजार आहेत अशा महिला”
हे कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला
“पण जर तुम्ही हाय रिस्क गटात असाल तर साध्या कोरोना लसीकरण केंद्रात न जाता सर्व सोयीसुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच कोरोना लस घ्यावी”, असा सल्लाही डॉ. देवरुखकर यांनी दिला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.