मुंबई: मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं यामध्ये कोण होते याची चर्चा सुरु आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो.
शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचं ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक याची दखल घेतील का,’ असा सवाल जलील यांनी केला आहे.