देहूगाव : श्री क्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या 17 पैकी 14 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी आता देहू नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके हे देहूच्या विजयाचे शिल्पकार ठरले असल्याने शेळके प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी कोणाला देणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
देहू नगरपंचायती मधील विजयी उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : मीना राहुल कुर्हाडे (प्रभाग क्र. 1 – 638 मते), रसिका स्वप्निल काळोखे (प्रभाग क्र. 2 – 733), पुजा अमोल दिवटे (प्रभाग क्र. 3 – 372), मयुर दत्तात्रय शिवशरण (प्रभाग क्र. 4 – 289), पुनम विशाल काळोखे (प्रभाग क्र. 6 – 467), स्मिता शैलेश चव्हाण ( प्रभाग क्र. 9 – 568), सुधिर सुरेश काळोखे (प्रभाग क्र. 10 – 571), पौर्णिमा विशाल परदेशी (प्रभाग क्र. 11 – 288), सपना जयेश मोरे (प्रभाग क्र. 12 – 360), प्रियंका अभिजित मोरे (प्रभाग क्र. 13 – 625), प्रविण रामदास काळोखे (प्रभाग क्र. 14 – 318), आदित्य चिंतामण टिळेकर (प्रभाग क्र. 15 – 630), योगेश बाळासाहेब परंडवाल (प्रभाग क्र. 16 – 503), ज्योती गोविंद टिळेकर (प्रभाग क्र. 17 – 475).
भाजपा : पुजा सुमित काळोखे (प्रभाग क्र. 8 – 307)
अपक्ष : शितल अनिल हागवणे ( प्रभाग क्र. 5 – 256), योगेश हनुमंत काळोखे (प्रभाग क्र. 7 – 650).
संत तुकाराम महाराजांच्या वास्तवाने पुनित झालेल्या देहू भुमीचा विकास व्हावा याकरिता देहू ग्रामपंचायतीचे देहू नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्यात आले. शासनाचा व नगरविकास विभागाचा निधी तसेच तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून देहूचा विकास साधताना तो नियोजनबद्ध व विकास आराखड्याप्रमाणे करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस या परिसराचे वाढते महत्व व भविष्यातील वाढणारी भाविक संख्या ध्यानात घेता देहूचा विकास साधण्यात येणार आहे. देहू नगरपंचायत झाल्यानंतर झालेली पहिली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 9 महिला नगरसेविका व 5 पुरुष नगरसेवक झाले आहेत. यापैकी कोणाला प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी मिळणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागली आहे. दरम्यान आमदार सुनिल शेळके यांनी देहू शहराला विकासाचे माॅडेल बनविण्याचे जाहिर केल्याने याठिकाणी नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा पहिपा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र सध्या तरी हे नाव आमदारांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.