महाराज ठोसर यांचा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ

0

पिंपरी : जाधववाडी, मोशी, पुणे येथील Woodville Phase 2 मधील सोसायटीच्या महिला वर्गातर्फे १९ जुलै ते २५ जुलै २०२३ यासप्ताहात बीड येथील कथावाचक श्री. अविनाशजी महाराज ठोसर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजनकरण्यात आले होते.

अधिक श्रावणाचा पर्वकाळ लक्षात घेऊन महिलावर्गाने पुढाकार घेऊन प्रथमच भागवत कथेच्या ज्ञानयज्ञाचे अत्यंत उत्साहात शिस्तबद्धआयोजन करून एक नवा पायंडा पाडला.

या सोहळ्याच्या आयोजनात, छाया वाघ, आशा मानकर, सीमा जोशी, वैशाली जगताप, माधुरी पातुरकर, शुभांगी कुलकर्णी, डॉ. वैशाली कर्डिले, चित्रा वैद्य अशा बऱ्याच महिलांनी अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम Woodville Phase 2 सोसायटी मधील सभासदांसाठी सादर केल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रमोद कुबडे यांनीमहिला मंडळ खरोखरच अभिनंदनासपात्र आहेतअसे वक्तव्य श्रीमद् भागवत कथा सप्ताहच्या सांगता समारोहाच्या वेळी केले आणि त्याच वेळी सोसायटीचे सेक्रेटरी अजितवाडकर या प्रसंगी उपस्थित होते.

भागवत सप्ताहात दररोज वेगवेगळ्या कथेच्या दरम्यान त्या प्रसंगाच्या घटना प्रत्यक्ष दाखविण्यात महिला कार्यकर्त्यांना भरपूर यश आले. जसे श्रीकृष्ण जन्म प्रसंगीचा पाळणा असो, वसुदेवाने बाल कृष्णास टोपलीतून आणण्याचा प्रसंग असो, श्रीकृष्णाचा विवाह सोहळाअसो दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम इत्यादी प्रसंग हुबेहूब उभे केले होते. या सप्ताहाच्या नियोजना बरोबरच आळंदीचे श्री बाळकृष्णगुरुजी यांनी मंत्रांच्याद्वारे होम हवनाचा कार्यक्रम केला होता.

सप्ताहाच्या नियोजना दरम्यान सोसायटीच्या सदस्यांनी सुद्धा सहभाग सहायक भूमिका निभावली होती. यामध्ये प्रकाश मानकर, अमित मानकर, अमोल वाघ, श्मिलिंद वाघ, वेदांत जोशी, परी मानकर, संदीप कुलकर्णी, राधा कुलकर्णी आणि मोहन जगताप‌ यांचामोलाचा वाटा होता. २५ जुलै रोजी महाप्रसादाने भागवत ज्ञान यज्ञाची सांगता करण्यात आली. पुढील वर्षी श्रावणात असाच कार्यक्रमयोजन्याचा संकल्प महिला मंडळांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.