पुणे : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने काम करुन शिक्षण घेणाऱ्या होतकरू शुभम जाधव या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात 35 गुण मिळविले आहेत.
शुभम हा हार्डवेअरच्या दुकानात काम करीत होता.त्यात त्याने हे यश मिळविले आहे. शुभम याला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले आहेत.त्याच्या या गुणांची सर्वत्र चर्चा चालू आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित,विज्ञान या पाचही विषयात त्याला ३५ गुण मिळाले आहेत. शुभम हा पुण्यातील गंजपेठेत राहतो. त्याच्या घरची परिस्थिती हालाखाची आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. दरमहा त्याला सहा हजार रुपये पगार मिळतो. वडील पाण्याच्या टाकीचं काम करतात.दहावीत त्याने सगळ्या विषयांचा अभ्यास केला होता. जास्त गुण मिळतील अशी त्याची अपेक्षा होती.मात्र त्याला कमी गुण मिळाले.