सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; शार्प शूटर संतोष जाधव अटकेत

0

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या पुण्याचा शार्प शूटर संतोष जाधव याच्या मुसक्या आवळण्यातपुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. संतोष याला पुणे पोलिसांनी आज उशीरा गुजरात येथून अटक केली असून यापूर्वी त्याचाचसाथीदार सिद्धार्श कांबळे (सौरभ महाकाल) याला पुण्यातील नारायणगाव येथून अटक करण्यात आली आहे

सिद्धू मुसेवाला यांच्यावर आठ जणांनी हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यातील दोघे हे पुण्यातील असल्याचे निदर्शनास आल्यानेपुणे पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरू केली होती. काही दिवसांतच नारायणगाव येथून सिद्धार्श कांबळे याला पोलिसांनी अटककेली आणि त्याच्या चौकशीअंती तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

कित्येक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असणारा आणि सिद्धू मुसेवाला हत्येतील शार्प शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनीगुजरात येथून अटक केली आणि रात्री उशीरा न्यायालयात दाखल केले. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी अधिक तपासासाठी 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी संबंधित माहितीला दुजोरा दिला असून अधिकमाहिती सोमवारी सकाळी देण्यात येईल असे सांगितले आहे.

 

कोण आहे संतोष जाधव?

संतोष जाधव हा आंबेगाव येथील पोखरी गावचा रहिवासी आहे. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले याच्या खूनप्रकरणी मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी काही महिन्यांपासून पुणे ग्रामिण पोलिस त्याच्या मागावरच होते. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला होता आणि यामध्ये संतोष जाधव याचे नाव समोर आले होते. यापूर्वी त्याच्यावर चोरीचा गुन्हासुद्धा दाखल होता. दरम्यान, मोक्का लावल्यानंतर पुणे ग्रामिण पोलिस अनेक दिवस संतोष जाधव या्च्या मागावर होते. त्यासाठी त्याचागुजरात, राजस्थान या ठिकाणी शोध घेतला जात असताना बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. परंतुमुसेवाला हत्याप्रकरणानंतर संतोष जाधवला अटक करण्यासाठी वेगाने चक्रे फिरू लागली. अखेर पुणे पोलिसांना गुजरात येथून संतोषजाधव याच्या मुसक्या आवळण्यास यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.