पुणे-पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आघाडीचे चिन्हे

0

पुणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाआघाडी आहे. त्याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिस्क असून दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना युती होणार असल्याचे विधान शिवसेनेचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले आहे. पण जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून या दोन्ही संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडून घेतला जाईल असेही अहिर यांनी सांगितले.

सचिन अहिर म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी निश्‍चित होणार आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. मात्र यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांच्याकडूनच तो घोषित करण्यात येईल असे असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.