गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

0

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी याच्या कचाट्यात सापडले आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश झाला आहे.

त्यांना काही लक्षणे दिसून येताच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. वयोमानानुसार त्यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

कोविडमुळे लता मंगेशकर यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली आहे. याला कोविड निमोनिया असेही म्हटले जाते. लता मंगेशकर शनिवारी रात्रीपासून ब्रिच कँडी रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.