“आयुक्त सुट्टीवर….. विद्यार्थी उघड्यावर…..”
अशा घोषणा देत शिक्षण समिती सभापती मनीषा पवार , भाजपच्या शिक्षण समिती सदस्या प्रियंका बारसे व अश्विनी वाघमारे यांनी आंदोलन केले. स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत आयुक्तांचा निषेध केला.
कोरोणच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे देश भरातल्या शाळा बंद झाल्या. आणि आता हळुहळू शाळा सुरू होत आहे.म्हणजेच माध्यमिक विद्यालये सुरू होऊन एक महिना झाला आहे. तसेच येत्या चार तारखे पासुन प्राथमिक विद्यालये सुरू होणार आहे.तरी देखील विद्यार्थ्यांना गणेश उपलब्ध झाले नाहीत. शालेय शिक्षण साहित्य, स्वयटर, बुट मोजे, पीटी गणवेश वाटप केलेले नाही.
मगरपलिकेच्या शाळेत गोरगरीब सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत असतात.पण पालिकेच्या मनमण्या कारभारामुळे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षण मात्र उघड्यावर आले आहे.