पिंपरी : निगडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने करवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 4) दुपारी सव्वाबारा वाजता यमुनानगर, निगडी येथे करण्यात आली.
अशोक दशरथ पवार (23, रा. चंदननगर, पुणे. मूळ रा. तिंत्रज, ता. भूम, जि. उस्मानाबाद), शामराव राजेश पवार (19, रा. निगडी), भीमा वाघमारे (रा. पाली, कोलवड, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक आणि शामराव या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक आणि शामराव यांनी त्यांच्याकडील एका पिशवीत गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. अशोक आणि शामराव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत दोन लाख 46 हजार 325 रुपये किमतीचा गांजा आढळला.
आरोपींनी हा गांजा बीड येथील भीमा वाघमारे याच्याकडून आणला असल्याने भीमा वाघमारे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.