पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण, पुण्यात एक

0

मुंबई : संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या ओमायक्रॉनचे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शिरकाव झाला आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात सहा रुग्ण आढळले आहेत.

Pune: Four persons who returned from foreign tours and three of their close contacts test positive for Omicron variant: Maharashtra health official

— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2021

नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी आलेल्या 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत असलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांचा प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज (रविवार) संध्याकाळी दिली आहे. तसेच पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यााच नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालावरुन सिद्ध झाले आहे.

Seven more people tested positive for the #Omicron variant of COVID19 in Maharashtra. Total 8 cases of Omicron variant reported in Maharashtra so far: State Public Health Dept

— ANI (@ANI) December 5, 2021

पिंपरीत सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांच्या निकटसहवासातील आहेत. नाजेरियातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याची दीड आणि 7 वर्षाच्या दोन मुली कोविड बाधित आल्या होत्या. या तिघांचा ओमायक्रॉन विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.