सहा वाहन चोरटे; 80 लाख रुपयांची वाहने पोलिसानी केली जप्त

0

पिंपरी : राज्यात आणि राज्य बाहेर वाहन चोरी करणारी टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून हायवा ट्रक, आयशर, छोटा हत्ती अशी सुमारे 80 लाख रुपयांची वाहने जप्त केली आहेत.

गणेश अर्जुन पुरी (28, रा. चाकुर, जि. लातूर ), प्रकाश नारायण गिरी (31, रा. हासेगाववाडी, ता. औसा जि. लातूर), कुशल अभिमन्यु जाधव (32, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी, जि.पुणे), जितेंद्र कृष्णकुमार यादव (22, रा. सांगवी, पुणे ), मुजुब महम्मद शेख (38, रा. लातूर) व जमशेद ऊर्फ फिरोज युनुस खान पठाण (38, रा. गालीबनगर, उस्मानाबाद), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चोरीला गेलेल्या हायवा ट्रक (एमएच 14 जीडी 1500) याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फूटेज पहिले असता देहुरोड व पौड याठिकाणी अश्याच चोऱ्या झाल्याचे समजले. या सर्व चोऱ्यांमध्ये इनोव्हा गाडी वापरल्याचे दिसून आले. इनोव्हा गाडीचा नंबर मिळवून पोलिसांनी गाडी मालकाची माहिती काढली.

दरम्यान, वारजे व हिंजवडी परीसरात याच गाडीतून चोरटे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुणे -बंगळुरू हायवेवर सुस येथे सापळा रचून पहाटेच्या सुमारास संशयीत इनोव्हा गाडी व आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, ठाणे, लातूर या ठिकाणावरुन वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हे चारचाकी वाहने चोरी करुन त्यातील जीपीएस सिस्टीम काढून रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत टाकून पोलिसांची दिशाभुल करत होते. अटक आरोपींकडून आतापर्यंत सात चारचाकी व एक दुचाकी असा एकूण 80 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यापैकी दाखल गुन्हयांतील एक हायवा ट्रक हा हैद्राबाद व एक आयशर टेम्पो हा तेलंगणा येथील जाहिराबाद येथे जाऊन पोलीस पथकाने ताब्यात घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.