सहा वर्षाच्या कार्तिक ने ‘संपर्क टाळा संसर्ग टाळा’ चा दिला संदेश

धूलिवंदन साजरा न करण्याचे केले आवाहन

0
पुणे : आजच्या आधुनिक काळात छोटी छोटी मुले ही आधुनिक विचारांची झाली आहेत. एवढेच नव्हे तर सामाजिक जाण ही त्यांना कळते. याचे उदाहरण म्हणजे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे येथे शिकत असलेल्या सहा वर्षाच्या कार्तिक मोनिका धनंजय खलाने याने होळी च्या सणा निमित्त रंग न खळण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. मी रंग सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणार नाही तुम्ही ही खेळू नका असे आवाहन करित संपर्क टाळा संसर्ग टाळा चा संदेश दिला आहे.

राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- 19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

याचे पालन व्हावे याच उद्देशाने सहा वर्षाच्या कार्तिक ने स्वतः होळी, धूलिवंदन, रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय घेतला आणि इतर लहान थोर मंडळींना न खेळण्याचे आवाहन केले.

असा मोलाचा संदेश दिला असून एवढ्या लहान वयात मोलाचा संदेश कार्तिक ने दिल्याने कार्तिकचे कौतुक करीत आहेत.कार्तिक हा अवघ्या सहा वर्षाचा असून तो पुणे शहरातील शनिवार पेठ येथे वास्तव्यास असणाऱ्या मोनिका खलाने यांचा मुलगा असून मोनिका खलाने या वकील आहेत तसेच भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधान मतदार संघातील प्रभाग १५ च्या उपाध्यक्षा आहेत. तसेच त्या ऑल इंडिया अँटिकरप्शन बोर्ड पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष ही आहेत.कार्तिक या सहा वर्षाच्या मुलाने दिलेल्या संदेशला तरी नागरिकांनी प्रतिसाद द्यावा व कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास सहकार्य करावे असे मोनिका खलाने यांनी ही सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.