पुणे : इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातून एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आई वडील रागावल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. कृष्णा भगवान चोरमले असे आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव आहे
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी कृष्णा घरी न सांगता परगावी फिरायला गेला. गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून तो इंदापूरला गेला होता. याच कारणामुळे घरातल्यांनी त्याला रागवून विचारणा केली.
याचाच राग आल्याने कृष्णाने आई वडील बाहेर गेल्यानंतर गळफास घेतला. कृष्णाने कॉटवर उभे राहत साडीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला.