युवा कार्यकर्ते नाना वाळके यांनी जपली सामाजिक बांधिलकी
एक हात बहिणीच्या भविष्यासाठी पुढे करण्याचे आवाहन
पुणे : रविवारी संपूर्ण राज्य, शहर रक्षाबंधन साजरी करत होते. मात्र पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केलेल्या सुरेश पिंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला. रविवारी रक्षा बंधन असल्याने औंध परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते नाना वाळके यांनी बहिणीची रक्षा करण्यासाठी हात पुढे केला आहे.
बोपोडी मधील पिंगळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने (सुरेश पिंगळे) आपला जीव गमावला. त्यामुळे वाळके यांनी प्रत्यक्ष त्यांचे घरी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली व आर्थिक मदत केली. तसेच या कुटुंबाच्या अडी-अडचणी दरम्यान नेहमी पाठीशी उभा राहण्याचे आश्वासन दिले आहे.
वाळके यांनी समाजातील दानुशर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे. मदत करु इच्छुणाऱ्यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.