मुंबई : राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. यामध्ये सोमय्यांना दुखापत झाली होती, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्राचं भाजप शिष्टमंडळ हल्ल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी दिल्लीला गेलं आहे. अशातच यावर बोलताना शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांच्या जखमेची खिल्ली उडवली आहे.
मी किरीट सोमय्या यांची जखम पाहिली असून ती सुपरफिशीअल वाटते. दगड मारल्यानं जखम झाली असती तर रक्त येत राहिलं असतं. जर काच लागली असती तर ती अडकली असती, दाढी करताना अशा प्रकारची जखम होण्याची शक्यता असल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांवर निशाणा साधला.
सोमय्या जे घडलं ते सांगायला दिल्लीत गेले ते ठीक आहे पण येताना कलह आणू नका, सुबत्ता घेऊन या, असं पेडणेकर म्हणाल्या. त्यासोबतच इथं अनेक पथकं यायचं असेल तर येऊ दे, कारण इथं अशी अनेक पथकं आलीत. दिल्लीचा आधार महाराष्ट्र आणि मुंबईला मिळत नसल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.