मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पार पडलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची मिमिक्री करतानात्यांच्यावर टीकाही केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर देखील बोट ठेवलं होतं. या सर्वाला आता शिवसेनानेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. नक्कल ही नेहमी मोठ्या माणसांचीच करतात जर मी जास्ती बोलतो तर तुम्हीही बोला असंप्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे.
पुण्यात मनसेचा १६ वा वर्धापन दिन पार पडला त्यात राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नकल करत त्यांच्यावर जोरदार टीका केलीहोती. आपण किती बोलतो काय आणि कसं बोलतो यांच भान ठेवा असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला होता. त्यांच्या याच टीकेला संजय राऊत यांनी लगेच प्रतिउत्तर दिल आहे.
सध्या देशात जे वातावरण आहे त्यावर सगळ्यांनी बोललं पाहिजे, तशीच परिस्थिती आहे असे संगतच ED ने आम्हाला बोलावलं पणआम्ही गप्प नाही बसलो, आम्ही बोलत राहणार कारण आम्ही कोणाचे मिंधे नाही आम्ही बोलतच राहणार. ही बाळासाहेबांची शिवसेनाआहे त्यामुळे शिवसेना नेहमी सत्य बोलत राहणार असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
वर्धापन दिनाच्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप केलाहोता. त्याला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. काही लोकं आजारी नसताना ही सक्रिय नसतात. आज राज्यात मुख्यमंत्र्यांएवढकोणीच सक्रिय नाही म्हणून राज्य पुढे चाललंय असं देखील त्यांनी संजय राऊत यांनी सांगितल आहे.