देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुणीतरी षडयंत्र रचत आहे

0

पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेमधीलच कुणीतरी षडयंत्र रचत आहे. त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेमधीलच कुणीतरी षडयंत्र रचत आहे. त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. शिंदे सरकारने जी जाहीरात दिली होती, त्यातही देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्यात आले होते. अशा जाहिरातीची काहीच गरज नव्हती. सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याचे षडयंत्र हे कुणीतरी सत्तेमधीलच लोक करत आहेत. हे दिसून येत आहे.

पुण्यात यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी यशस्विनी सनमान सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या ‘एक दिवस धर्मासाठी’ अशा प्रकारची जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, माझे आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांनी कधीही अशाप्रकारची गोष्ट मला शिकवलेली नाही. हरीचे नाव एकदा घेतले तरी चालते. पांडुरंग असा एकच देव आहे जो म्हणतो मला भेटण्यास येण्याची गरज नाही. तुम्ही चांगले काम करा मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक दिवस धर्मासाठी या गोष्टीची गरजच काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजात सध्या अंधश्रद्धा वाढत आहे. राज्यात वारकऱ्यांवर हल्ले होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. या घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या घटना आहेत. सध्या ‘ गद्दार ‘शब्द वापरला तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल, असे सांगितले जाते. अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहे. ही लढाई आपणास लढायची असून महिलांनी काही काळ डोळ्यातील अश्रू बाजूला ठेवून कणखरपणे लढा द्यायचा आहे. महिलाचे मन निर्मळ असते. तिच्या मनात करुणा असते. मात्र, तिच्यावर अत्याचार झाला तर ती झाशीची राणी होते. माझी लढाई कधीही पुरुषांशी नाही. कोणतीही लढाई सुसंस्कृतपणे लढायची असते. त्यामध्ये शब्दांचा वापर योग्य प्रकारे करायचा असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.