सोनाली कुलकर्णी अनुभवतेय लंडनचा गारवा

0

मुंबई ः आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी लंडनला गेलेली मराठमोळी सोनाली कुलकर्णी हिने लंडनमधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंडवर शेअर केले आहेत. चाहत्यांनीही तिच्या या कूल लूकला चांगलीच पसंती दर्शविली आहे. लंडनच्या मुलायम थंडीचा चांगलाच सोनालीवर झालेला दिसतो आहे.

सोनालीने अंगात जॅकेट घातलेला आहे आणि तिच्या पाठिमागच्या परिसरात पसरलेली झाडांची पाने दिसत आहेत. या फोटोमुळे सोनालीचा फोटो मनमोहक तर, दिसतोच आहे. त्याचबरोबर ती आणखी सुंदर दिसत आहे. अभिनेता संतोष जुवेकर याच्याबरोबरही एक फोटो शेअर केलेला आहे.

सोनाली विनामेक अपचीदेखील तितकीच खास दिसते. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि काॅमेंट्स दिल्या आहेत. दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांच्या ‘थ्री चिअर्स टू’ या सिनेमाच्या शुटींगसाठी सोनाली आणि संतोष गेलेले आहेत. सोनाली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.