‘द ग्रीड लोभ’ चित्रपटातील गाणी झाली रिलीज

0

मुंबई ः ‘द ग्रीड लोभ’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. एका सामान्य मुलगा करोडपती होण्याचे स्वप्न पाहतो आणि चुकीचा मार्ग निवडतो, अशी या सिनेमाची कथा आहे. श्रेयशी चौधरी याने चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनदेखील केले आहे. तसेच तो आणि अभिनेता सुमित चौधरी हे दोघे या चित्रपटाद्वारे बाॅलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत.

या सिनेमाच्या ट्रेलरवरून सनाजातील एका वास्तव गोष्टीला मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिसते. हा चित्रपट पाहायचा असेल तर, प्रेक्षकांना एमएक्स प्लेअर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण, तो चित्रपट ओटीटीवर रिलिज करण्यात आला आहे.

नुकतेच चित्रपटातील गाणी हंगामा म्युझिकद्वारे रिलीझ करण्यात आले आहेत आणि आता पहिले व्हिडिओ गाणे परफेक्टिओ एंटरटेनमेंटच्या यूट्यूबवर प्रसिद्ध झाले आहे. शीर्षक गीत सुमित चौधरी यांनी लिहिले आहे आणि नितेश श्रीवास्तव यांनी आवाज दिला आहे. नितीश श्रीवास्तव आणि पुनीत अवस्थी यांनी  ही गाणी कंपोज केली आहेत.

चित्रपटात सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक सखोल संदेश आहे तर त्यात यश आणि परिश्रमांचा खरा अर्थ सांगितला आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत आणि ती सर्व प्रेरक, प्रेम आणि भावनाप्रधान आहे. निर्माता आणि दिग्दर्शक यांनी संगीतावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.