सोनिया गांधीचे पत्र मुख्यमंत्र्याना सुपूर्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद

0

मुंबई ः समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची विनंती काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केली होती. हे पत्र घेऊन काॅंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी यांची सूचना रास्त असून एक मित्रपक्ष म्हणून काॅंग्रेस नेहमीच समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव संपतकुमार, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकात हंडोरे, मुंबईचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, राजाराम देशमुख हे शिष्टमंडळ सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

महाविकास आघाडी सरकारला शरद पवार मार्गदर्शन करीत आहेत. तसेच सोनिया गांढी यांचेदेखील मार्गदर्शन लाभत आहे. उभय पक्ष नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी पत्रांतून संवाद सुरू आहे. दलित, मागासवर्गी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात काॅंग्रेसने आयोजित केली होती. काही मुद्दे यातून चर्चेत आले होते. त्यासंदर्भात सोनिया गांधी यांनी पत्र लिहून सूचना केल्या आहेत, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.