मुंबई ः टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला शविनारी हार्ट अटॅक आलेला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ती यशस्वीदेखील झाली आहे. सध्या सौरव गांगुलीची प्रकृती स्थीर आहे. सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली आणि रिपोर्टही निगेटिव्ह आलेला आहे.
शनिवारी सौरव गांगुलीला हार्ट अटॅक आल्यामुळे दक्षिण कोलकाताच्या वूडलॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करताना डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यानंतर रुग्णालयात त्यावा दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ”गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत”, असे ट्विट करून सौरव गांगुलीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.
“मी दादाला चांगल्या मूडमध्ये बघितलं. मी त्याच्याशी गप्पा मारल्या. दादाला आनंदी बघून चांगलं वाटलं. तो नेहमीप्रमाणे आनंदी होता. तो आपल्या हृदयात आहे. आपल्याला त्याच्याविषयी प्रचंड आदर आहे. तो देशासाठी खेळला आहे. त्याने आपला अभिमान वाढला आहे. मला ज्यावेळस ही बातमी कळाली, त्यानंतर रुग्णालयाच्या संपर्कात आहे. रुग्णालयाकडून दाखल केल्याची माहिती मिळाली. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे”, अशी माहिती राज्यपाल जयदीप धनकर यांनी दिली.