लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने लोणावळ्यात आज सकाळी सात वाजता संकल्प नशामुक्ती मॅरेथॉनचे आयोजनकरण्यात आले.”भागो और नशा भगावो” या टॅग लाईनखाली संकल्प नशामुक्ती या मॅरेथॉनला हिरवा झेंडा हिंदी फिल्म अभिनेता सुनीलशेट्टी यांनी दाखवला. लोणावळकरांनी यास चांगला प्रतिसाद दिला.
स्पर्धेत तीन गट करण्यात आले,लहान मुलांचा 3 ते 15 वयोगट तसेच तरुणाई 20 ते 35 आणि जेष्ठांचा एक गट 40 ते 60 असे तीनगटात महिला पुरुष एकत्र धावले.. सात वाजता लोणावळा शहरांमधून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. लोणावळा शहरात मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थ मिळतात किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते असे बोलले जाते. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडूनलोणावळ्यात नशामुक्ती मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहे. या नशामुक्ती मॅरेथॉन मध्ये अभिनेता सुनील शेट्टी सह शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी, महिला, पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
सुनील शेट्टी म्हणाले कि, नशा ही वाईट आहे कोणी जर याच्या आहारी गेला तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, त्याला अजून त्यागर्केत टाकू नका,किंवा पोलिसानी ही अश्या नशा करण्याऱ्या तरुणाई वर कारवाई न करता त्याना सुधारण्याचा मौका द्यावा असंआवाहन शेट्टी यांनी केल.
या मॅरेथॉनसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारे, पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारीसहभागी झाले होते.