नवी दिल्ली : रशियाची लस ‘स्पुतनिक व्ही’चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे.
पॅनेसिया वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे. स्पुतनिक लस ही कोरोनाविरोधात अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरडीआयएफने सांगितले की, पॅनेसिया बायोटेकने बनविलेली लसीची पहिली बॅच ही क्वालिटी कंट्रोलसाठी स्पुतनिक व्ही विकसित करणाऱ्या रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅमेलियाला पाठविली जाणार आहे.