मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी पथक डॉमिनिकामध्ये

सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत पथकासोबत

0

मुंबई : कोट्यवधीचे कर्ज बुडवून फरार असणाऱ्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी आठ अधिकाऱ्यांची टीम सध्या डॉमिनिकामध्ये आहे. बँकांच्या फ्रॉड प्रकरणांमध्ये सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांनीच पीएनबी घोटाळ्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. चोक्सी 2018 पासून अँटिगामध्ये राहत आहे. सध्या त्याला डॉमिनिकामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

डॉमिनिकामध्ये पोहोचलेल्या 8 सदस्यांच्या या टीममध्ये सीबीआय, ईडी आणि सीआरपीएफचे दोन दोन अधिकारी आहेत. बँकिंग अफरातफर प्रकरणांच्या सीबीआय प्रमुख शारदा राउत या टीमच्या मुख्य सदस्य आहेत. त्यांनीच पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झाला आहे. त्या 2005 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची काम करण्याची एक वेगळीच स्टाईल आहे.

पालघरमध्ये एसपी असताना त्यांनी गुन्हेगारीवर जबरदस्त नियंत्रण मिळविले होते. नागपूर, मीरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले होते.

ही टीम 28 मे रोजी डॉमिनिकामध्ये पोहोचली आहे. उद्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या सुनावणीमध्ये ही टीम वकिलांना मदत करणार आहे. ईडीची टीम उद्या तेथील न्यायालयात अॅफिडेव्हीट दाखल करणार आहे. यामध्ये मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाईल. याचा अहवाल तयार असून आज केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर तो उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.