६८ कोटी ८७ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता

0
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणाया एकूण सुमारे ६८ कोटी ८७  लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
 निगडी-दापोडी या बीआरटीएस कॉरीडॉर वरील डेडीकेटेड लेनची आणि बस स्टॉपची दुरुस्ती करण्याकामी ९७ लाख रुपये खर्च होणार आहे तर वाल्हेकरवाडी येथे स्पाईन रोड लगत डी.आय वितरण नलिका पुरविणे आणि टाकण्यासाठी येणा-या २५ लाख रुपये खर्च होईल.
बो-हाडेवाडी व आल्हाट वस्ती परिसर, पिंपळे निलख येथील कस्पटेवस्ती परिसर, मोशी मधील बनकरवस्ती व खिरीडवस्ती परिसर तसेच  गवळीनगर आणि परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी २८ लाख रुपये खर्च होईल. तर ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध उद्याने देखभाल करण्याकामी होणा-या ५१ लाख रुपये, बोपखेल येथे ठिकठिकाणी ट्रिमिक्स कॉक्रीट करण्याकामी ३२ लाख रुपये, प्रभाग क्र.६ मध्ये सेवा वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांची खडीकरण व एमपीएम पध्दतीने सुधारणा करण्यासाठी २३ लाख रुपये खर्च होणार आहे.
वृक्षप्राधिकरणाने तयार केलेले व मंजुरकेलेले २०२०-२१ चेसुधारीत सुमारे २० कोटी ३७ लाख रुपये आणि  सन २०२१-२२ चे मुळअंदाजपत्रक सुमारे ३६ कोटी ६४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी या विषयाची शिफारस महापालिका सभेकडे करण्यात आली.
पाणीपुरवठा विषयक विविध कामांसाठी ५७ कोटी रुपये खर्च होणार आहे. पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविधठिकाणी संप-पंप हाऊस बांधणे आणि इतर सलग्न कामे करण्यासाठी १४ कोटी ५२ लाख रुपये खर्च होणार आहेत.
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना मनपाच्या वतीने पाणी पुरविण्यात येते.या पाण्याचा दर निश्चित करण्यासाठी महापालिका सभेकडे शिफारस करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.