स्थायी समिती लाच प्रकरण! हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव : अजित पवार

0

पिंपरी : लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षाला अटक होते हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. जनतेच्या कर रुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव असल्याची, कडवट टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच प्रकरणी 18 ऑगस्ट रोजी अटक झाली होती. एसीबीच्या पथकाने महापालिकेत धाड टाकत त्यांना अटक केली होती. यावर आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथील एका खासगी कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.

लाच प्रकरणात अडकलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा भाजपने अद्यापही राजीनामा घेतला नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, ”राजीनामा घ्यावा की, नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी 1991 पासून 2017 पर्यंत  20 वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत. जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक ‘अॅक्शन’ घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही. जनतेचे प्रतिनिधीत्व करत असताना जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.