पिंपरी : ९ लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह चौघांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे.
लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.
९ लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ९ लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ॲन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. २ लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.