स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे अनिश्चित काळासाठी निलंबन

0
नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कुस्ती महासंघाने ही कारवाई केली. टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान तिने केलेलं वर्तन तिला चांगलंच महागात पडलं. तिने नियमांचे उल्लघंन करत शिस्तभंग केल्याचे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आणि तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. विनेश फोगटसह कुस्तीपटू सोनम मलिक हिलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
विनेश फोगाट हिच्याकडून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. ती एखादे पदक मिळवेल असे मानले जात होते. पण तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. सुरुवातीपासूनच तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अखेर क्वॉर्टरफायनलमध्ये ती स्पर्धेतून बाहेर फेकली गेली. महिलांच्या 53 किलो वजनी गटात तिचा पराभव झाला. विनेशला बेलारूसच्या वॅनेसा कलाडजिंस्कायाने धूळ चारली.
विनेशने भारतीय संघाचे स्पॉन्सर असलेल्या शिव नरेश या कंपनीचे कपडे न घालता नाईकी ब्रँडचे कपडे घातले. त्यामुळे तिच्यावर ही कारवाई झाली. WFI च्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, अशाप्रकारचे वर्तन करणे हा शिस्तभंगच आहे. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे. जोवर ती या सर्व आरोपांबद्दल फेडरेशनला योग्य ते उत्तर देत नाही, तोपर्यंत तिला कोणत्याही प्रकारच्या कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही.
रेंसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (WFI) विनेश फोगाटला नोटीस पाठवली होती. त्यावर 16 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. विनेश टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी हंगेरीमध्ये प्रक्टीस करत होती. तेथूनच ती टोक्योला आली. त्यानंतर इतर खेळाडूंसोबत सहभागी होऊन तिने सराव सुरु केला. पण मूळ स्पर्धेत मात्र तिला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.