पिंपरीतील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने त पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांवर महापालिकेच्या कै.यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल , जिजामाता हॉस्पिटल , भोसरी हॉस्पिटल , ऑटो क्लस्टर चिंचवड , बालनगरी भोसरी , घरकुल आदि ठिकाणी उपचार केले जात आहेत . तसेच शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये देखील अनेक रुग्ण उपचार सुरू आहेत . आज शहरांमध्ये कोरोना रूग्णांसाठी आय.सी. यु , ऑक्सीजन बेड , व्हेंटिलेटर बेड रुग्णांसाठी कमी पडू लागले आहेत .
पुढील काळामध्ये एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या वेग पाहता बेडची संख्या वाढवावी लागेल . नेहरूनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम याठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे . या रुग्णालयात ४०० बेड सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी एसी बंद झाल्यामुळे रुग्णांना उकाड्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे . ही बाब अत्यंत गंभीर असून या रुग्णालयात आठशे बेड असून हे रुग्णालय त्वरित पूर्ण क्षमतेने सुरु होण्याच्या बाबत लक्ष घालून प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे जम्बो कोविड सेंटरमधील सर्व त्रुटी दूर करून येथील आयसीयू , ऑक्सीजन बेड , व्हेंटिलेटर बेड पूर्ण क्षमतेने त्वरित सुरु करून पिंपरी चिंचवडकरांना व पुणेकरांना मोठा दिलासा द्यावा अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे .