पिंपरी : चाकण जवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते. आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेनेपलायन केले आहे.
उद्योजकांवर झालेल्या गोळीबाराची दखल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घेतली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वरिष्ठपोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षालाही याबाबत कळविण्यात आलेआहे.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनाही या गोळीबाराबाबत कळविण्यात आले आहे. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोळीबार व्यावसायिक वादातून झाला की अन्य कारणावरून झाला याबाबतचे नेमके कारणआणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीपाहणी केली जात आहे.