सख्या आईने केला मुलीचा खून; आरोपी महिला अटकेत

0

पिंपरी : किरकोळ कारणावरून आईने मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण करत तिचा खून केला. त्यानंतर मुलगीफरशीवरून पडली असल्याचे खोटे सांगत रुग्णालयाची आणि पोलिसांची दिशाभूल केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सावत्रआईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किराणा सामान संपले. सामान संपण्यापूर्वी तू मला का सांगितले नाही, असे म्हणत सावत्रआईने 13 वर्षीय सावत्र मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण केली. यात मुलीच्या हातावर, पायावर, पाठीवर, डोक्याला मारलागला. तसेच आरोपीने मुलीच्या छातीवर हाताने, पायाने मारून तिला गंभीर दुखापत केली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुलगी बेसावध झाल्याचे लक्षात येताच आरोपी आईने मुलीला थेरगाव येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातदाखल करताना मुलगी घरात पायऱ्यांवरून घसरून पडली असल्याचे आरोपीने सांगितले. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याससांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.