शेअर बाजाराची दमदार उसळी; निर्देशांकाची 60 हजारावर सुरुवात

0

मुंबई : जागतिक बाजाराकडून मिळत असलेल्या सकारात्मक संकेतांमुळे देशातील शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात 58 हजाराचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. त्यानंतर बाजारात अशीच तेजी राहिल्यास निर्देशांक 60 हजाराचा ऐतिहासिक टप्पा गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. आता शुक्रवारी बाजाराने सुरुवातीलाच 60 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

शुक्रवारी बाजाराला सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 273 अंकाची वाढ नोंदवत 60,158.76 टप्पा गाठला. त्यानंतर निर्देशांक वाढ नोंदवत 60,333 पर्यंत पोहचला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 75 अकांची वाढ नोंदवत 17,897.45 वर सुरू झाला. त्यानंतर निफ्टीतही तेजी आली आणि निर्देशांक 17,947.65 पर्यंत पोहचला होता. हा निफ्टीचा आतापर्यंतचा विक्रम आहे.

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नाही. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात गुरुवारी तेजी होती. त्याचे परिणाम देशाच्या बाजारावर झाले असून बाजारातही तेजी आली आहे. अमेरिका मदत पॅकेज सुरू ठेवेल, असे संकेत असल्याने बाजारात तेजी असल्याचे दिसून येत आहे.

चीनच्या केंद्रीय बँकेने रोख रक्कम देत Evergrande प्रकरणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. Evergrande कंपनी दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याने त्याचा परिणाम जगातील शेअर बाजारावर दिसत आहे. Evergrande कंपनीवर 304 अब्ज डॉलरचे (सुमारे 22.45 लाख कोटी रुपये) कर्ज आहे. त्यामुळे हींकपनी दिवाळखोरीत निघाल्यास लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत निघाल्यावर आलेल्या मंदीसारखी समस्या निर्माण होऊ नये, असे भीती अनेकांना आहे.

अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने दिलासा दिल्याने Evergrande चा फारसा परिणाम सध्या बाजारावर दिसत नाही. त्यामुळे जागितक बाजारात सकारात्मक वातावरण असल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ऐतिहासिक 60 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने 17 हजाराचा टप्पा ओलांडत विक्रम नोंदवला आहे. गुरुवारीही बाजारात तेजी होती. बाजारात अशीच तेजी राहिल्यास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 62 हजाराचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.