पुणे पोलिसांवर दगडफेक; सहा जणांना अटक

0

पुणे : साऊंड सिस्टीम बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वीस ते पंचवीस जणांच्या जमावाने तुफान दगडफेक करून पोलिसाला जखमी केले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
हा प्रकार पाषाण परिसरातील लमाणतांडा येथे घडला.

ढेकू भिकू मेघावत (38), रामा उर्फ प्रमोद हनुमंत मेघावत (24) हिरामण भीमा राठोड (29) लक्ष्मण भीमा राठोड (25) संजय वालिया धानावत (27),  व्यंकटेश मोतीराम खेतावत (20), एकनाथ धनावत आणि खेमु खेतावत यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर सुरेश चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

लमाणतांडा येथील जगदंबा चौकात साऊंड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी गेले होते. लावलेले साऊंड सिस्टिमवर पोलीस कारवाई करत असताना आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

सदर आरोपी ढाकू मेघावत याने त्या ठिकाणी जमलेल्या मुलांना उद्देशून ‘ पोलिसांनी आपले साऊंड बंद करून जप्त केले आहेत त्यांना आज सोडायची नाही’ अशी चिथावणी दिली. त्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.