पिंपरी : देहूफाटा आळंदी येथे एक महिला वेश्या व्यवसायासाठी राजरोसपणे रस्त्यावर थांबत असे. तिला एका स्थानिक महिलेनेहटकले असता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने स्थानिक महिलेला कापून टाकण्याची धमकी दिली. या विरोधात मंगळवारी (दि. 17) रात्री स्थानिक नागरिकांनी आळंदीत रास्तारोको आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील देहूफाट्यावर एक महिला रस्त्यावर उभी राहून वेश्याव्यवसाय करीत होती. एका स्थानिकमहिलेने तिला व तिथे असलेल्या रिक्षा चालकास हटकले. त्यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेने स्थानिक महिलेस कापूनटाकण्याची धमकी दिली. यामुळे स्थानिक महिलेने इतर महिलांना बोलावून रास्तारोको केला.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दिघीपोलिसही घटनास्थळी दाखल झाले. साबळे यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना याबाबत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र आम्हाला स्थानिक दिघी पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन पाहिजे, असा आंदोलकांनी आग्रह धरला. अखेर दिघी पोलिसांनीहीयाबाबत कडक कारवाई करू. तसेच या भागात रस्त्यावर असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागेघेण्यात आले.