कंपनी व्यवस्थापनावर दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

0

पिंपरी : कंपन्यांमधील कामे मिळवण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव टाकणाऱ्यांवर पोलीस कठोर करतील; असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. कंपनीच्या संबंधित व्यक्तीने घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले.

चाकण एमआयडीसीतील कंपनी प्रतिनिधी आणि महाळुंगे पोलीस यांची संयुक्त बैठक आज (दि. 26) एआरएआय कंपनीत पार पडली. त्यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते. बैठकीसाठी सहाय्यक आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, एमआयडीसी परिसरात भयमुक्त वातावरण राहण्यासाठी पोलिसांकडून विशेष भर दिला जाईल. स्थानिक व्यक्तींनी कंपनीत काम मिळवण्यासाठी, कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्ट, ट्रान्सपोर्ट, टेंडर मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव टाकून धमकी देऊन काम करून घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

स्थानिक प्रतिनिधी यांनी स्वार्थी आणि मोजके हितसंबंध बघणा-या लोकांनी केलेली दिशाभूल वेळीच ओळखून त्यांना आवार घालावा. परिसरात आणखी कंपन्या सुरु होऊन रोजगार निर्मिती होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. कंपन्यांमध्ये होणा-या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपनीतील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवायला हवी. कंपनी परिसरात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे देखील गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.